Sunday, July 07, 2024 12:34:04 AM

शिउबाठाची दुसरी यादी

शिउबाठाची दुसरी यादी

मुंबई, ३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी शिउबाठाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीद्वारे चार उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर राणे, हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सत्यजीत पाटील, पालघर लोकसभा मतदारसंघातून भारती कामडी आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातून करण पवार यांना शिउबाठाने उमेदवारी जाहीर केली आहे.

कोण आहेत वैशाली दरेकर राणे ?

कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळालेल्या वैशाली दरेकर राणे या शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. नंतर त्यांनी पक्षातर करून मनसेत प्रवेश केला. मनसेकडून पण त्या नगरसेविका राहिल्या होत्या. त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेत विरोधीपक्ष नेते पद भूषवले होते. मनसेकडून २००९ मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यांना एक लाख नऊ हजार मते मिळाली होती. नंतर २०१६ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा उद्धव यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांना शिउबाठाने कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.

शिउबाठाने घेतली आघाडी

पालघर आणि कल्याण या दोन लोकसभा मतदारसंघांतील महायुतीचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. या दोन्ही ठिकाणी उमेदवार जाहीर करून शिउबाठाने आघाडी घेतली आहे.

शिउबाठाची दुसरी यादी, ४ उमेदवार जाहीर

कल्याण - वैशाली दरेकर राणे
हातकणंगले - सत्यजीत पाटील
पालघर - भारती कामडी
जळगाव - करण पवार

अशी होणार लढत

हातकणंगले – धैर्यशील माने, शिवसेना विरुद्ध सत्यजीत पाटील, शिउबाठा विरुद्ध दादासाहेब उर्फ दादागौडा पाटील, वंचित विरुद्ध मनीषा डांगे / प्रा. संतोष कोळेकर, ओबीसी बहुजन विरुद्ध राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना (मतदान ७ मे २०२४)
जळगाव – स्मिता वाघ, भाजपा विरुद्ध करण पवार, शिउबाठा (मतदान १३ मे २०२४)


सम्बन्धित सामग्री