Thursday, April 24, 2025 06:09:18 AM

उन्मेष पाटीलांचा शिउबाठात प्रवेश

उन्मेष पाटीलांचा शिउबाठात प्रवेश

मुंबई, ३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्याचे खासदार उन्मेष पाटील यांनी बुधवारी शिउबाठा गटामध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जळगावचे खासदार उन्मेष पाटील यांचा पक्षप्रवेश भाजपाला धक्का देणारा आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपाने स्मिता वाघ यांना तिकीट दिल्याने नाराज होऊन उन्मेष पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे. उन्मेष पाटील यांच्यासह पारोळा येथील नगराध्यक्ष करण पवार यांनीही शिउबाठामध्ये प्रवेश केला.

कोण आहेत उन्मेष पाटील?

उन्मेष पाटील भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेले जळगाव मतदारसंघाचे खासदार आहेत. २०१४ मध्ये त्यांनी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवली होती आणि ते निवडूनही आले होते. २०१४ ते २०१९ या कालावधीत त्यांनी आमदार म्हणून काम पाहिले आहे.  


सम्बन्धित सामग्री