Tuesday, April 01, 2025 01:42:06 AM

अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात दिलजमाई

अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात दिलजमाई

मुंबई, २ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात दिलजमाई झाली आहे. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी भाजपाच्या नेत्यांशी चर्चा केली. यानंतर अजित आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्यात फोनवरून चर्चा झाली. चर्चा यशस्वी झाली. चर्चेनंतर हर्षवर्धन पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्याचे निर्देश दिले.

सुनेत्रा पवार अजित पवार यांची पत्नी आहेत, त्या बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. तर हर्षवर्धन पाटील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपाचे नेते आहेत. हर्षवर्धन पाटील यांची पश्चिम महाराष्ट्रातील सहकार उद्योगात आणि राजकीय वर्तुळात स्वतःची अशी मोठी ताकद आहे. ही ताकद आता सुनेत्रा पवार यांच्या पाठिशी असेल. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस १५ एप्रिलच्या आसपास सुनेत्रा पवार यांचा प्रचार करण्यासाठी इंदापूर येथे एक सभा घेण्याची शक्यता आहे. या सभेद्वारे महायुती सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार आहे.


सम्बन्धित सामग्री