Monday, March 31, 2025 05:14:16 AM

काँग्रेसने आंबेडकरांचा अपमान केला

काँग्रेसने आंबेडकरांचा अपमान केला

मुंबई, २९ मार्च २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसने आधी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. आता तीच परंपरा पुढे सुरू ठेवत त्यांनी प्रकाश आंबेडकरांचा अपमान केला, असे शिवसेनेचे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल शेवाळे म्हणाले. ते मुंबईत बोलत होते. लोकसभा निवडणुकीत मतदार आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांचा मतदानाच्या माध्यमातून बदला घेतील, असा विश्वास राहुल शेवाळे यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक घटक पक्षाची भूमिका महत्त्वाची

लोकसभा निवडणुकीत प्रत्येक घटक पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून सहकार्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवाळेंनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही भेटणार असल्याचे ते म्हणाले.


सम्बन्धित सामग्री