Saturday, October 05, 2024 02:37:39 PM

सांगलीच्या जागेचा वाद दिल्लीत

सांगलीच्या जागेचा वाद दिल्लीत

नवी दिल्ली, २७ मार्च २०२४, प्रतिनिधी : शिउबाठाने राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघांसाठी पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहेत. सांगलीतून शिउबाठाने डबल केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ही घोषणा होताच काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे राज्यातील नेते शिउबाठाबाबतची नाराजी व्यक्त करण्यात दिल्लीला रवाना झाले आहेत.

काँग्रेस नेते शिउबाठावर नाराज

काही दिवसांपूर्वी उद्धव यांनी सांगलीत सभा घेऊन सांगलीचा पक्षाचा उमेदवार कोण असेल हे जाहीर केले होते. उद्धव यांच्या घोषणेबाबत काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसने नाराजी व्यक्त केल्यानंतरही शिउबाठाने सांगलीतून जाहीर केल्याप्रमाणे डबल केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. यानंतर काँग्रेसचे राज्यातील नेते शिउबाठाबाबतची नाराजी व्यक्त करण्यात दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीला रवाना झालेल्या नेत्यांमध्ये काँग्रेस नेते विश्वजीत कदम आहेत. विश्वजीत कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधताना नाराजी प्रकट केली.

सांगली लोकसभा मतदारसंघ अनेक वर्षांपासून काँग्रेस लढवत आहे. हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे. हे माहिती असूनही शिउबाठाने सांगलीतून परस्पर उमेदवार जाहीर केला आहे. शिउबाठाच्या या कृतीमुळे काँग्रेसचे विश्वजीत कदम उद्धव यांच्यावर संतापले आहेत. त्यांनी हा संताप पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

शिउबाठाच्या महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी

१) बुलढाणा - प्रा. नरेंद्र खेडेकर
२) यवतमाळ-वाशिम - संजय देशमुख
३) मावळ संजोग वाघेरे पाटील
४)सांगली - चंद्रहार पाटील
५) हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर
६)छत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरे
७)धाराशीव - ओमराजे निंबाळकर
८) शिर्डी - भाऊसाहेब वाघचौरे
९) नाशिक - राजाभाऊ वाजे
१०) रायगड - अनंत गीते
११) सिंधुदुर्ग - रत्नागिरी - विनायक राऊत
१२) ठाणे - राजन विचारे
१३) मुंबई - ईशान्य - संजय दिना पाटील
१४) मुंबई - दक्षिण - अरविंद सावंत
१५) मुंबई - वायव्य - अमोल कीर्तिकर
१६) परभणी - संजय जाधव
१७) मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई


सम्बन्धित सामग्री