Monday, July 01, 2024 02:23:15 AM

दंगेकरांचा मोहोळ यांच्यावर आरोप

दंगेकरांचा मोहोळ यांच्यावर आरोप

पुणे, २४ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नुकतेच पक्षांनी पुणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केले. महाविकास आघाडीतून काँग्रेसचे रवींद्र दंगेकर पुणे लोकसभेसाठी लढणार आहेत. तर महायुतीमधून भाजपाने पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी जोरदार तयार चालु झाली आहे. रवींद्र दंगेकर आणि मुरलीधर मोहोळ विरूद्ध लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आमच्याकडे बजरंग बलीचे क्षेत्र आहे, पैलवानाचे क्षेत्र आहे. पैलवान हा सगळ्यांचा असतो. सर्वसामान्यांच्या घरात जन्माला येतो. मुरलीधर मोहोळ यांनी पैलवानांनी कधी अर्धा लिटर दूध पाजले नाही. त्यांनी बिल्डर लोकांना दूध पाजले. असा आरोप आमदार दंगेकर यांनी मोहोळांवर केला आहे. तसेच मोहोळ यांच्याकडे पैलवान असतील तर आमच्याकडे वस्ताद आहे अशी टीकाही त्यांनी मोहोळ यांच्यावर केली आहे.


सम्बन्धित सामग्री