Tuesday, July 02, 2024 08:21:27 AM

केजरीवालना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी

केजरीवालना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी

नवी दिल्ली, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : दारू घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे. दिल्लीच्या राउस अॅव्हेन्यू न्यायदंडाधिकाऱ्यांनी हा निर्णय दिला. याआधी अटक झाल्यानंतर केजरीवाल यांनी अटकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी केलेला अर्ज मागे घेतला.

केसीआरची मुलगी ईडी कोठडीत

दिल्लीच्या दारू घोटाळ्यात ईडीने केसीआरच्या मुलीला अर्थात तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी के. कविताला अटक केली. सध्या के. कविता ईडी कोठडीत आहे. भारत राष्ट्र समितीचे संस्थापक के. चंद्रशेखर राव यांची मुलगी आणि तेलंगण सरकारची माजी मंत्री के. कविताला दिल्लीच्या राउस अॅव्हेन्यू न्यायदंडाधिकाऱ्यांनी ईडी कोठडी दिली. यानंतर कविताने दिलेली माहिती आणि हाती आलेले पुरावे याच्या आधारे ईडीने केजरीवाल यांना अटक केली.

केजरीवाल यांच्यावर असलेले आरोप

दारू घोटाळ्यातून अबकारी कराऐवजी आपसाठी निधी संकलन
दारू घोटाळ्यात केजरीवाल, सिसोदिया, के. कविता यांचा हात
केजरीवाल दारू धोरण ठरवण्यात सहभागी
दारू धोरणाचे सूत्रधार केजरीवाल
गोवा निवडणुकीसाठी पैशांचा वापर
निवडक लोकांना झाला लाभ
हवालाद्वारे गोव्याला पाठवले ४५ कोटी रुपये

केजरीवालांनी केली ईडीच्या अधिकाऱ्यांची हेरगिरी - सूत्र

केजरीवालांच्या घरातून १५० पानी फाईल जप्त
फायलीमध्ये ईडी अधिकाऱ्यांची माहिती
केजरीवाल अडचणीत सापडण्याची शक्यता


सम्बन्धित सामग्री