Friday, July 05, 2024 02:00:42 AM

काँग्रेसमध्ये बागुलांची नाराजी

काँग्रेसमध्ये बागुलांची नाराजी

पुणे, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने पक्षाने त्यांची लोकसभा उमेदवार यादी जाहीर केली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात आमदार रवींद्र दंगेकर यांना उमेदवारी देण्यात येत आहेत. दंगेकर यांच्या लोकसभा उमेदवारीमुळे काँग्रेस नेते आणि सात टर्म नगरसेवक असलेले आबा बागुल नाराज झाले आहेत. बागुलांची नाराजी व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे समोर आली आहे. पुण्यात निष्ठेची हत्या अशा व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे बागुलांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. पुण्यात काँग्रेसकडून पुणे लोकसभा निवडणुक लढण्यास आबा बागुल इच्छुक होते. पण आमदार असलेले रवींद्र धंगेकर याना उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेसमधील धुसफूस समोर येत आहे.

काय म्हणाले बागुल?

आमदार रवींद्र धंगेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माजी उपमहापौर आबा बागुल आक्रमक झाले आहेत. मी कोणाच्याही चपला उचलणार नाही म्हणत आबा बागुल भाऊक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. राहुल गांधी एका बाजूला न्याय यात्रा काढतात मग निष्ठावंतांना न्याय मिळणार की नाही असा संतप्त सवालही त्यांनी काँग्रेसला केला आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे सांगत लोकशाही मार्गाने काँग्रेभवनवर कँडल मार्च काढणार असे स्पष्ट केले.


सम्बन्धित सामग्री