Monday, July 01, 2024 02:36:08 AM

पुणे लोकसभा निवडणुकीत काटे की टक्कर

पुणे लोकसभा निवडणुकीत काटे की टक्कर

पुणे, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : राज्यात लोकसभेचे वारे वाहु लागले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी त्यांचे उमेदवार दिले आहेत. भाजपाकडून पुणे लोकसभा निवडणुक मुरलीधर मोहोळ लढणार आहेत. तर काँग्रेसकडून पुणे लोकसभा निवडणुकीसाठी रवींद्र दंगेकर यांची उमेदवारी निश्चित केली आहे.

भाजपाचे मुरलीधर मोहोळ पुण्याचे माजी महापौर होते. तर रवींद्र दंगेकर मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून निवडून आलेले आमदार आहेत. मुरलीधर मोहोळ शांत, सुसंस्कृत आणि संयमी आहेत. मोहोळ हा नेहमी वादापासून लांब राहिलेला चेहरा आहे तसेच त्यांचा तगडा जनसंपर्क आहे. तर दुसरीकडे रवींद्र दंगेकर हे आक्रमक, तगडा जनसंपर्क आणि कसबा पेठ पोटनिवडणूक जिकूंन भाजपाच्या बालेकिल्ल्यातून विजयी झालेले काँग्रेसचा लोकप्रिय चेहरा आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार तोडीस तोड असल्याने पुणे लोकसभेची निवडणूक रंगतदार होणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुण्यात लोकसभा निवडणुकीसाठी काटे कि टक्कर पाहायला मिळणार आहे.  


सम्बन्धित सामग्री