Tuesday, July 02, 2024 08:56:00 AM

महायुतीतील नाशिक उमेदवारी?

महायुतीतील नाशिक उमेदवारी

नाशिक, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांकडून उमेदवार याद्या जाहीर करण्यात येत आहेत. भाजपाने आतापर्यंत दोन उमेदवार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र भाजपाकडून नाशिकच्या जागेसाठी उमेदवारी यादीमध्ये कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी वाद पाहायला मिळत आहे. कारण नाशिकच्या जागेवर महायुतीतील भाजपा आणि शिवसेना दोन्ही पक्ष दावा करत आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागा भाजपाला मिळावी यासाठी नाशिक जिल्हा भाजपा कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांसमोर घोषणाबाजी करत नाशिक जागेवर दावा केला. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा या जागेची आतुरता वाढवत आहे.

महायुतीमध्ये मनसेचा प्रवेश होण्याची शक्यता असल्याने या जागेवर अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळेच या जागेवरील निर्णयाला विलंब होण्याची शक्यता दिसून येत आहे. मनसेकडून तीन जागांवर उमेदवारी मागण्यात येत आहे.त्यात नाशिकच्या जागेचे समावेश असल्याकारणाने नाशिकची उमेदवारी जाहीर होण्यास विलंब होत आहे.   

                    

सम्बन्धित सामग्री