Saturday, October 05, 2024 06:46:02 PM

सीता सोरेन भाजपात, झामुमोला धक्का

सीता सोरेन भाजपात झामुमोला धक्का

रांची, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी : झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदार आणि पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस सीता सोरेन यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. झामुमोचा राजीनामा दिल्यानंतर काही तासांतच सीता सोरेन यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. दिल्लीत भाजपा मुख्यालयात सीता सोरेन यांचा पक्ष प्रवेश झाला.

आमदार सीता सोरेन यांचा राजीनामा

झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदार सीता सोरेन यांनी पक्षाचा राजीनामा दिला. सीता सोरेन या माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या वहिनी आहेत.

माझी आणि माझ्या कुटुंबाची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या प्रकाराने त्रस्त होऊन राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे सीता सोरेन यांनी झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांना पत्र लिहून कळवले. शिबू सोरेन हे सीता सोरेन यांचे सासरे आहेत.

'मी झारखंड मुक्ती मोर्चाची राष्ट्रीय सरचिटणीस आणि सक्रीय कार्यकर्ता आहे. आमदार म्हणून कार्यरत आहे. माझे पती दिवंगत दुर्गा सोरेन झारखंड मुक्तीच्या लढ्यात आघाडीचे योद्धे होते. पण हा इतिहास विसरून आता माझी आणि माझ्या कुटुंबाची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पक्ष सध्या अशा लोकांच्या हाती जात आहे ज्यांना या पक्षाच्या उद्देशांशी काहीही देणेघेणे नाही.' अशी तक्रार शिबू सोरेन यांना पत्राद्वारे करत सीता सोरेन यांनी पक्षाचा राजीनामा दिला. याआधी ३१ जानेवारी २०२४ रोजी ईडीने आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केले.

                 

सम्बन्धित सामग्री