Saturday, April 19, 2025 06:10:57 AM

सुनील तटकरेंचं अनंत गीतेंवर टीकास्त्र

सुनील तटकरेंचं अनंत गीतेंवर टीकास्त्र

मुरूड, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या रायगडमधील सभांमध्ये अनंत गीते सुनिल तटकरे यांच्यावर टीका करत आहेत. यावर मुरूडमधून तटकरे यांनी या टिकांचा खरपूस समाचार घेतला आहे. सुनिल तटकरे द्वेषा पोटी तुम्ही एका व्यासपीठावर आलात अशी टीका अनंत गीते यांनी तटकरे यांच्यावर केली. त्यावेळी द्वेषावर राजकारण होत नसतं. विकासाच्या कामांवर राजकारण होतं असा सल्ला तटकरे यांनी विरोधकांना देत विश्वास या मुद्द्यावरून गीतेच्या आरोपांना विनोदांची उपमा देत तटकरे यांनी गीतेंना टिकेचे लक्ष केले. रामदास कदम, भास्कर जाधव यांच्यासह शिवसेना नेत्यांचा उल्लेख करीत गीते यांनी विश्वास घात केल्याचा आरोप तटकरे यांनी केला. ३० वर्ष संसदेत गेलात. स्वतःच काम दाखवा असे आव्हान तटकरे यांनी यावेळी गीते यांना दिले. 


सम्बन्धित सामग्री