Saturday, September 28, 2024 05:43:41 PM

केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांचा राजीनामा

केंद्रीय मंत्री पशुपती पारस यांचा राजीनामा

नवी दिल्ली, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी : रालोआचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकजनशक्ती पक्षाला भाजपाने लोकसभेची एकही जागा दिलेली नाही. पण रामविलास पासवान यांचे पुत्र आणि पशुपती पारस यांचे पुतणे चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षासाठी बिहारमध्ये लोकसभेच्या पाच जागा देणार असल्याचे जाहीर केले. हा निर्णय जाहीर होताच नाराज झालेल्या पशुपती पारस यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला. याआधी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांनी पशुपती पारस यांनी लोकजनशक्ती पक्ष फोडून केंद्रात मंत्रिपद मिळवले होते. त्यावेळी चिराग पासवान यांनी पक्ष फुटला तरी राओला सोडली नव्हती. या निष्ठेच्या बदल्यात लोकजनशक्ती पक्षाला बिहारमध्ये लोकसभेच्या पाच जागा देणार असल्याचे भाजपाने जाहीर केले.

बिहारमध्ये लोकसभेसाठी राओलाचे जागावाटप जाहीर

भाजपा - १७ जागा लढवणार

जनता दल संयुक्त - १६ जागा लढवणार (२०१९ मध्ये १७ जागा लढवल्या होत्या)

लोकजनशक्ती पक्ष - ५ जागा लढवणार

हिंदुस्तानी अवाम मोर्चा - १ जागा लढवणार

राष्ट्रीय लोक जनता दल - १ जागा लढवणार

              

सम्बन्धित सामग्री