पुणे, १९ मार्च २०२४, प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे पालन काटेकोर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. यामुळे जिल्ह्यातील 35 हजार फलक प्रशासनाने हटविण्यात आले आहेत. तब्बल ३५ हजार फलक प्रशासनाकडून हटवण्यात आले आहेत.
निवडणुकांच्या काळात फलक हटवले
नुकतच भारतीय निवडणुक आयोगाने पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. जेव्हा आचारसंहिता लागू होते. तेव्हा काही गोष्टींवर बंदी आणली जाते. त्यातलच एक म्हणजे आचासंहिता लागू झाल्यावर कुणाच्याही घरावर, जमिनीवर, कुणाच्याही घराच्या परिसरात, भिंतीवरदेखील राजकीय पक्षाचे फलक लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घेणं आवश्यक आहे. विनापरवानगी प्रचार करण्याची अनुमती नसते अन्यथा आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल होतो.