Wednesday, April 23, 2025 09:28:13 PM

प. बंगालमध्ये लवकरच भाजपाचे सरकार येईल - अमित शाह

प बंगालमध्ये लवकरच भाजपाचे सरकार येईल - अमित शाह

नवी दिल्ली, १४ मार्च, २०२४, प्रतिनिधी: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना इशारा दिला आहे. ममता यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अधिसूचनेवर जे विधान केले होतं त्यावर शाह यांनी जोरदार प्रहार केला. लवकरच भाजपा पश्चिम बंगालमध्ये सत्तेवर येईल आणि घुसखोरी थांबवेल, असं अमित शाह म्हणाले. ममता जर या मुद्द्यावर राजकारण करत असतील आणि अशा महत्त्वाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याविरोधात उभ्या असतील तर ते चुकीचे आहे. कोणी काहीही केले तरी हा कायदा कधीही मागे घेतला जाणार नाही, असेही शहा म्हणाले.


सम्बन्धित सामग्री