Wednesday, April 23, 2025 03:21:30 PM

वसमतमध्ये जरांगेंसह समर्थकांविरोधात गुन्हा दाखल

वसमतमध्ये जरांगेंसह समर्थकांविरोधात गुन्हा दाखल

हिंगोली, १४ मार्च, २०२४, प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील राज्यभरात दौरा करत आहे. अशातच हिंगोलीच्या वसमत शहर आणि वसमत ग्रामीण पोलीस ठाणे अशा दोन्ही ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यासह ८० ते ९० जणांवर गुन्हे दाखल केले आहे.

हिंगोलीच्या वसमत इथं मंगळवारी मनोज जरांगे पाटील हे मराठा समाज संवाद बैठकीसाठी आले होते. विनापरवाना मोटरसायकल रॅली काढणे, विनापरवाना लाऊड स्पीकर लावणे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे.


सम्बन्धित सामग्री