Friday, July 05, 2024 10:48:13 PM

डॉ. सुभाष भामरेंना धुळ्यातून तिसऱ्यांदा संधी

डॉ सुभाष भामरेंना धुळ्यातून तिसऱ्यांदा संधी

धुळे, १४ मार्च, २०२४, प्रतिनिधी : भाजपाने राज्यातील २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात धुळे लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. भामरे यांच्या उमेदवारीनंतर त्यांचे धुळे शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी पक्षाने तिसऱ्यांदा दिलेल्या संधीचे सोने करू, अशी प्रतिक्रिया डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केली.

गेल्या दहा वर्षात या मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्याचा आपण कायमच प्रयत्न केला, या ठिकाणची ९० टक्के कामे पूर्ण केली असून उर्वरित दहा टक्के कामे येत्या काळात नक्कीच पूर्ण करू, असं सुभाष भामरे म्हणाले.

डॉ. सुभाष भामरे यांनी १९९५ साली राजकारणात प्रवेश केला. काँग्रेस, शिवसेना आणि आता भाजपा असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. २००४ साली धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून भामरे यांनी निवडणूक लढवली होती. यानंतर २०१४ साली भाजपाकडून लोकसभेच्या निवडणुकीत डॉ. भामरे हे विजयी झाल्यानंतर त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण राज्यमंत्रीपदाची धुरा सोपवली होती. २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचा पुन्हा एकदा दुसऱ्यांदा विजय झाला होता.
कर्करोग तज्ञ म्हणूनही त्यांची ओळख आहे.


सम्बन्धित सामग्री