Friday, March 28, 2025 05:26:56 PM

मुनगंटीवारांचे महाराष्ट्रातून पॅकअप

मुनगंटीवारांचे महाराष्ट्रातून पॅकअप

नवी दिल्ली, १३ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची दुसरी यादी जाहीर झाली. या यादीतून जाहीर केलेल्या नावांमुळे शिंदे सरकारचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे महाराष्ट्रातून पॅकअप झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र भाजपाचे माजी अध्यक्ष आणि सध्याचे शिंदे सरकारचे कॅबिनेट मंत्री असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. यामुळे राज्याच्या राजकारणातून मुनगंटीवार यांना बाहेर काढण्यात आल्याची चर्चा आहे.

कोण आहेत सुधीर मुनगंटीवार ?

अवघे १७ वर्षांचे असल्यापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात
चंद्रपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयात विद्यार्थी संघटनेचे सचिव
चंद्रपूरमधून १९८९ आणि १९९१ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली आणि पराभूत झाले
नागपूर विद्यापीठातून एमफिल
महाराष्ट्र भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, १९९३
चंद्रपूरमधून आमदार, १९९५; ५५ हजार मतांनी विजय
शिवसेना - भाजपा युती सरकारचे पर्यटनमंत्री, ग्राहक संरक्षण मंत्री, १९९५ - १९९९
महाराष्ट्र भाजपाचे सरचिटणीस, १९९९
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, २००१
महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष, २०१०
भाजपा - शिवसेना युती सरकारचे अर्थमंत्री, वनमंत्री, २०१४ - २०१९
शिंदे सरकारमध्ये वनमंत्री, सांस्कृतिक मंत्री, मत्स्यपालन मंत्री


सम्बन्धित सामग्री