Sunday, July 07, 2024 10:27:41 PM

काँग्रेसकडून लोकसभेसाठी दुसरी यादी जाहीर

काँग्रेसकडून लोकसभेसाठी दुसरी यादी जाहीर

नवी दिल्ली, १२ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर झाली आहे. के सी वेणुगोपाल यांनी ही यादी जाहीर केली आहे. राज्य आणि राज्यातील उमेदवारांची नावे वेणुगोपाल यांनी वाचून दाखवली. काँग्रेसने दुसऱ्या यादीमध्ये ४३ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. घोषित ४३ उमेदवारांपैकी ३३ ओबीसी, एससी, एसटी किंवा अल्पसंख्याक समुदायातील आहेत.

काँग्रेसने माजी खासदार कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ यांना छिंदवाडामधून उमेदवारी दिली आहे. दरम्यान, काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई आसामच्या जोरहाटमधून तर राहुल कासवा हे राजस्थानच्या चुरूमधून निवडणूक लढवणार आहेत. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा वैभव गेहलोत यांना राजस्थानच्या जालोरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे सचिन पायलटचे नाव दुसऱ्या यादीत नव्हते.

यापूर्वी, काँग्रेसने आगामी निवडणुकीसाठी ३९ उमेदवारांची नावं जाहीर केली होती. त्यात राहुल गांधी यांचा समावेश आहे. राहुल केरळच्या वायनाड मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना राजनांदगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच के सी वेणुगोपाल केरळमधील अलाप्पुझा येथून निवडणूक लढवणार आहेत, तर शशी थरूर यांना तिरुअनंतपुरममधून उमेदवारी देण्यात आली आहे.

                 

सम्बन्धित सामग्री