Saturday, October 05, 2024 06:44:46 PM

नायब सिंग सैनी होणार हरियाणाचे नवे मुख्यमंत्री

नायब सिंग सैनी होणार हरियाणाचे नवे मुख्यमंत्री

चंडीगढ - हरियाणात राजकीय गोंधळ सुरूच आहे. या गदारोळात मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. खट्टर यांनी चंदीगडमध्ये कॅबिनेट मंत्र्यांसह राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर कुरुक्षेत्राचे खासदार नायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. ते ओबीसी प्रवर्गातील असून कुरुक्षेत्रचे खासदार आहेत. नायब सिंह हे माजी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जातात.

नायब सिंग सैनी हे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील आहेत आणि कुरुक्षेत्रचे खासदार आहेत. नायब सिंग हे मुख्यमंत्री मनोहरलाल यांचे जवळचे मानले जातात. १९९६ मध्ये त्यांनी भाजपासोबत आपला राजकीय प्रवास सुरू केला आणि २००० पर्यंत एकत्र काम केले. यानंतर, २००२ मध्ये ते भाजपा युवा मोर्चाचे अंबालाचे जिल्हा सरचिटणीस बनले. २००५ मध्ये भाजपाच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.


सम्बन्धित सामग्री