Friday, July 05, 2024 01:45:11 AM

विजय शिवतारे अपक्ष लढण्याची शक्यता

विजय शिवतारे अपक्ष लढण्याची शक्यता

बारामती, ११ मार्च २०२४, प्रतिनिधी : विजय शिवतारे २०१९चा वचपा काढणार, दोन्ही पवारांची धाकधूक वाढली सासवडमधील पालखीतळावर अजित पवार यांनी केलेला अपमान केवळ विजय शिवतारेंचा नसून तो पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे, असा घणाघात करत पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारेंनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष लढण्याची तयारी दाखवली आहे. रविवारी पुरंदरच्या सासवड शहरात झालेल्या एका कार्यक्रमात शिवतारेंनी आता बदला घेण्याची वेळ आली आहे, असे सांगत बारामती लोकसभा मतदारसंघ कुणा एकाच्या नावावरचा ७ / १२ नाही, अशी टीका दोन्ही पवारांवर केली.

https://youtu.be/K42CW_vM0qc?si=U9PVAsYsUbMyXiQu

कसा केला होता पराभव
राष्ट्रवादीत असलेले आणि नंतर शिवसेनेत गेलेले विजय शिवतारे यांना अजित पवार यांनी आव्हान देऊन २०१९ च्या निवडणुकीत पराभूत केले होते. त्यावेळी विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांवर जोरदार टीका करायला सुरूवात केली होती. त्यामुळे अजित पवार आक्रमक झाले होते. त्यांनी शिवतारे यांना चँलेज दिले. अजित पवार म्हणाले होते की, “तुला यंदा दाखवतो तु कसा आमदार होतो ते. महाराष्ट्राला माहितीय मी जर ठरवलं एखाद्याला आमदार होऊ द्यायचे नाही तर मी कुणाच्या बापाला ऐकत नाही.” त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी विजय शिवतारे यांचा पराभव केला होता. यामुळे विजय शिवतारे त्या पराभवाचा वाचपा बारामती लोकसभा मतदार संघात काढणार असल्याची राजकीय चर्चा रंगू लागली आहे.

शिवतारे अपक्ष लढण्याची शक्यता का आहे ?

अजित पवार आणि विजय शिवतारे यांचा वाद सर्वश्रुत
आधी राष्ट्रवादीत असलेले शिवतारे हे २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेत गेले.
अजित पवार यांनी थेट आव्हान देऊन शिवतारेंचा पराभव केला होता.
शिवतारे यांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले.
सध्या राष्ट्रवादी शिवसेनेसोबतच्या युतीत
युती असली तरी शिवतारेंच्या मनात पवारांबद्दल राग कायम
युतीत असल्याने शिवतारेंना तिकीट मिळणं कठीणच


सम्बन्धित सामग्री