Sunday, October 06, 2024 05:13:19 AM

राजस्थानमध्ये काँग्रेसला खिंडार

राजस्थानमध्ये काँग्रेसला खिंडार

राजस्थान, १० मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीपूर्वी राजस्थान काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय आणि माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते लालचंद कटारिया यांच्यासह पक्षाच्या ३२ नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जयपूर येथील भाजप प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, भाजप प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

काँग्रेसच्या या नेत्यांसोबत त्यांच्या अनेक समर्थकांनी ‘हात’ सोडून ‘कमळ’ हाती घेतले आहे.नागौरचे अनेक दिग्गज जाट नेते काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. काँग्रेस नेत्यांचा भाजपात प्रवेश केल्यामुळे भाजपमध्ये उत्साह आहे.राजस्थानमधील २५ पैकी २५ जागा जिंकू असा दावा भाजपने पुन्हा एकदा केला आहे.

काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांमध्ये गेहलोत सरकारमध्ये मंत्री असलेले लालचंद कटारिया, राजेंद्र यादव, माजी आमदार रिचपाल मिर्धा, खिलाडी लाल बैरवा, आलोक बेनिवाल, विजयपाल मिर्धा, माजी भिलवाडा जिल्हाध्यक्ष रामपाल शर्मा यांचा समावेश आहे. यापैकी कटारिया हे गेहलोत यांच्या जवळचे मानले जातात.तर खिलाडी लाल बैरवा हे सचिन पायलटचे कट्टर समर्थक मानले जातात. तर रामपाल शर्मा हे विधानसभेचे माजी अध्यक्ष सीपी जोशी यांच्या जवळचे आहेत.


सम्बन्धित सामग्री