Friday, July 05, 2024 06:32:09 AM

गोयलांचा आयुक्त पदावरून राजीनामा

गोयलांचा आयुक्त पदावरून राजीनामा

दिल्ली,१० मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारताचे निवडणुक आयुक्त अरूण गोयल यांनी शनिवारी त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्विकारला आहे. निवडणुक तोंडावर असताना आयुक्तांनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आलं आहे. गोयल यांच्या राजीनाम्यावरून आयुक्तांचा राजीनामा हा मोदी शाह यांचा डाव असल्याची टीका शिउबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत यांनी मोदी शाह यांच्या निशाणा साधला आहे. त्याचबरोबर निवडणुक आयुक्तांचा राजीनामा ही चिंतेची बाब असल्याची टीका राषपच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=4amf19NkoKA

गोयल यांच्या नियुक्तीवरून वाद

अरूण गोयल यांना नोव्हेंबर २०२२ मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांच्या नियुक्तीचं प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं. सुप्रीम कोर्ट गोयल यांच्या अत्यंत वेगाने झालेल्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरून बराच वाद निर्माण झाला होता.


सम्बन्धित सामग्री