Friday, April 11, 2025 09:14:29 AM

नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार?

नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार

अमरावती, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : अमरावती जिल्ह्यातील विश्रामगृह येथे भाजपाच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वपूर्ण असणार आहे. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित असणार आहेत. या बैठकीसाठी भाजपाचे सर्व लोकसभा संयोजक देखील उपस्थित राहणार आहेत. बैठकीआधी आमदार रवी राणा पालकमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेले आहेत. काही दिवसांपासून खासदार नवनीत राणा भाजपाच्या कमळ चिन्हावर लोकसभा निवडणुक लढणार असल्याच्या वारंवार चर्चा ऐकायला मिळत आहेत. अशातच आमदार रवी राणा यांचे भाजपाच्या बैठकीआधी पालकमंत्री पाटील यांना भेटणे अशा चर्चांना उधाण देणारे ठरत आहे. तसेच अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये कमळाच्या चिन्हावर उमेदवार देण्यावर नेते आणि पदाधिकारी आग्रही आहेत.

या बैठकीनंतर काय घडेल? असा प्रश्न सर्वांना पडत आहे. अमरावतीमधील भाजपाच्या संघटनात्मक बैठकीनंतर वरिष्ठांकडून अमरावती लोकसभा उमेदवार निश्चित करण्याच्या शक्यता आहेत. त्यामुळे नवनीत राणा कमळ चिन्हावर अमरावतीतून निवडणुक लढतील की नाही? हे लवकरच कळेल. तसेच अशा प्रकारच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळेल.       


सम्बन्धित सामग्री