बारामती, ७ मार्च २०२४, प्रतिनिधी : गृहमंत्र्यांच्याच पक्षातील नेत्यांना जर धमकी दिली जात असेल तर हे दुर्देवी आहे. ‘अबकी बार गोळीबार सरकार’ असं झालेलं असल्याचे राशपच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटलांवरील धमकीवर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन पाटलांना तातडीने सुरक्षा द्यावी अशी मी गृहमंत्र्यांना विनंती केलेली असल्याचेही सुळेंनी सांगितले आहे. पाटलांना धमकी देणे इतपत अशा लोकांची हिंमतच कशी होती असं म्हणत गृहमंत्र्यांना प्रश्न केला आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या
हर्षवर्धन पाटील हे बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि त्यांना जर कोणी अशा प्रकारची धमकी देत असेल तर आम्ही सहन करणार नाही. हे महाराष्ट्र गुंडाराज नाही. ज्या व्यक्तींनी उभ आयुष्य सामाजिक कामासाठी दिलं त्यांना अशी धमकी कोण देत असेल तर अतिशय दुर्देवी आहे.