Wednesday, July 03, 2024 12:19:12 AM

मुखी राम प्रत्येकाला काम – मुख्यमंत्री शिंदे

मुखी राम प्रत्येकाला काम – मुख्यमंत्री शिंदे

ठाणे, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : ठाणे येथे नमो महारोजगार मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले. ठाण्यातील हा पाचवा रोजगार मेळावा आहे. देशातील सर्वात मोठ्या ठाण्यातील या रोजगार मेळाव्याला त्यांनी संबोधित केले.

मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

३० हजारांपेक्षा जास्त तरुण मेळाव्यात उपस्थित - मुख्यमंत्री
रोजगार मेळाव्यांतर्गत ५-६ हजार तरुणांना रोजगार प्राप्त झाला आहे - मुख्यमंत्री
हे उत्साहाचे नाही तर महाउत्सहाचे वातावरण आहे - मुख्यमंत्री
महायुतीची महविकासाकडे जाणारी वाटचाल पाहतोय - मुख्यमंत्री
डबल इंजिन सरकारचा लोकांना डबल फायदा झाला पाहिजे - मुख्यमंत्री
स्वच्छतेत आपलं राज्य पहिल्या नंबरला आहे - मुख्यमंत्री
२१० आमदार असलेले मजबूत सरकार आहे - मुख्यमंत्री
लोकसभा निवडणुकीनंतर रोज आरोप करणारे, शिव्या श्राप देणारे घरी बसतील आणि बेरोजगार होतील - मुख्यमंत्री
घरात बसून फेसबुक लाईव्ह करणारे नाही तर फेस टू फेस काम करणारे सरकार आहे - मुख्यमंत्री
यशस्वी पंतप्रधान भारताला अर्थव्यवस्थेत ५ क्रमांकावरून जगात तिसऱ्या क्रमांकावर येऊन जातील - मुख्यमंत्री
आधीच्या सरकारने स्पीड ब्रेकर लाऊन ठेवले होते - मुख्यमंत्री
कौशल्य विकासाच्या माध्यमातून १ लाख नोकऱ्या दिल्या - मुख्यमंत्री
मुखी राम आणि प्रत्येकाला काम हे आमचं ध्येय - मुख्यमंत्री
‘मु मे राम, बगल में छुरी’ असे आम्ही नाही - मुख्यमंत्री
गडचिरोलीमध्ये विकासाला चालना देण्याचं काम सुरू आहे - मुख्यमंत्री
११ हजार महिलांना घरघंटी आणि मशीन वाटप करण्यात येत आहे - मुख्यमंत्री
एकाच छताखाली सर्व योजना देणारं सगळ्यात पहिलं राज्य - मुख्यमंत्री


सम्बन्धित सामग्री