Monday, July 01, 2024 02:52:54 AM

युगेंद्र पवारांवर धनगर संतापले

युगेंद्र पवारांवर धनगर संतापले

बारामती, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : बारामतीत युगेंद्र पवार सध्या गाव दौरा करत आहेत. या दरम्यान नागरिकांच्या भेटी घेत त्यांच्या समस्या ऐकत आहेत. या गाव भेटी दरम्यान मराठा आणि धनगर समाजाच्या नागरिकांशी चर्चा करत आहेत. या चर्चेवेळी धनगर समाजातील युवकांनी युगेंद्र पवार यांना धनगर आरक्षणासंदर्भात जाब विचारला आहे. एवढे दिवस तुमचे आजोबा सत्येत असताना धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गाचे आरक्षण का मिळालं नाही? बारामतीत धनगर समाजातील तरूण १४ दिवस आमरण उपोषणाला बसला होता त्यावेळी तुम्ही का भेट दिली नाही? धनगर समाजातील लोक युगेंद्र यांच्यावर असा संतप्त भाषेत चर्चा करताना पाहायला मिळाली. एकंदरीतच त्यांना बारामतीतील मराठा आणि धनगर समाजाच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे.

कोण आहेत युगेंद्र पवार?

युगेंद्र पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आहेत. आतापर्यंत ते राजकारणात सक्रिय नव्हते. त्यांच्यावर विद्या प्रतिष्ठान संस्थेचे खजिनदार पदाची जबाबदारी आहे तसेच बारामती तालुका कुस्तीगीर संघाचेही ते काम पाहतात. शरद पवार आजोबांना पाठिंबा देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.


सम्बन्धित सामग्री