Tuesday, December 03, 2024 10:46:33 PM

एमआयएम खासदार अडचणीत ?

एमआयएम खासदार अडचणीत

अमरावती, ६ मार्च २०२४, प्रतिनिधी : खासदार नवनीत राणा यांना आलेल्या धमकी प्रकरणी एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील या दोघांची चौकशी करण्याची मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे. आमदार रवी राणा हे खासदार नवनीत राणा यांचे पती आहेत.

नवनीत राणा यांनी उघडपणे हिंदुत्ववादी भूमिका घेतली आहे. या भूमिकेमुळेच त्यांना धमक्या येत असल्याची शक्यता रवी राणा यांनी व्यक्त केली. उद्धव मुख्यमंत्री असताना त्यांनी कोविड संकटात मंदिरातील देवदर्शन बंद केले होते. पण मुसलमानांच्या सणांसाठी वेगळे नियम लागू केले होते. यावरून नागरिकांमध्ये नाराजी होती. याच काळात उद्धव यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा म्हणणार असा इशारा नवनीत राणा यांनी दिला होता. या प्रकरणात नवनीत राणा यांना उद्धव सरकारने काही दिवस अटक करून तुरुंगात ठेवले होते. अयोध्येतील राम मंदिराचे समर्थन करणारी नवनीत राणांची काही वक्तव्येही गाजली होती. आता हिंदुत्ववादी भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या नवनीत राणा यांना धमकी आली आहे. एका व्यक्तीने पाकिस्तानमधून बोलत आहे, असे सांगत नवनीत राणा यांना धमकीचा ध्वनीमुद्रीत संदेश पाठवला. या संदेशात नवनीत राणा तसेच पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना शिव्या देण्यात आल्या. आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला. या धमकी प्रकरणात ओवेसी आणि इम्तियाज जलील यांची चौकशी करण्याची मागणी आमदार रवी राणा यांनी केली आहे.

'ओवेसी आणि इम्तियाज जलील यांची चौकशी करा'
आमदार रवी राणा यांची मागणी
खासदार राणा यांना धमकी मिळाल्याचे प्रकरण
नवनीत राणा यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतल्याने धमकी'
आमदार रवी राणा यांचे वक्तव्य
धमकी प्रकरणी एमआयएम खासदार अडचणीत?


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo