Monday, July 01, 2024 02:56:06 AM

बारामतीत अजित पवारांच्या पाठीशी १०० ग्रामपंचायती

बारामतीत अजित पवारांच्या पाठीशी १०० ग्रामपंचायती

प्रतिनिधी, बारामती, दि. ४ मार्च २०२४ :  बारामती तालुक्यातील १०० ग्रामपंचायती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी असल्याची विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे. सगळ्या सरपंच आणि उपसरपंचांचा अजित पवारांना पाठिंबा आहे. पुढील आठवड्यात सगळ्या ग्रामपंचायतीच्या बैठका होणार आहेत. त्यामुळे स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार संवाद साधून याबाबतची माहिती देणार आहेत.

बऱ्याच दिवसांपासून बारामती मतदारसंघावर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार भाजपसोबत सत्तेत गेल्यापासून बारामती मतदारसंघ विशेष चर्चेत आहे कारण याआधी बारामतीत लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे उमेदवार राहिलेल्या आहेत. मग अजित पवार बारामती मतदारसंघातून कोणाची उमेदवारी जाहीर करतील असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाची चर्चा होती.


सम्बन्धित सामग्री