मुंबई, १ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे दोन आमदार आपापसात भिडल्याची घटना विधानभवनाच्या इमारतीत घडली. मंत्री दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात हमरीतुमरी झाली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ही घटना घडली. ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर बोलणे टाळले.
दादा भुसे हे मंत्री आणि नाशिकचे पाकमंत्री आहेत. तर महेंद्र थोरवे हे कर्जत खालापूरचे आमदार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा भुसे एकत्र विधानभवनाबाहेर आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयावर बोलणे टाळले. 'अधिवेशनात काय घडले ते विचारा पोडियमवर बोलू' असे सांगत मुख्यमंत्री जास्त न बोलता निघून गेले.