Friday, July 05, 2024 03:16:33 AM

रोहित पवारांची ट्रोल आर्मी गजाआड

रोहित पवारांची ट्रोल आर्मी गजाआड

मुंबई, १ मार्च २०२४, प्रतिनिधी : राशपचे आमदार रोहित पवार यांचा कार्यकर्ता योगेश सावंत याची रवानगी १४ दिवसांसाठी तुरुंगात झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी योगेश विरोधात कारवाई केली. याच प्रकरणात योगेश व्यतिरिक्त आणखी दोन जणांनाही पोलिसांनी अटक केली आहे. याआधी पोलिसांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेचा वापर आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कलम १५३ अ, ५००, ५०५ (३), ५०६ (२), ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. याआधी राशप समर्थक असलेल्या एका व्यक्तीने तीन मिनिटांत ब्राह्मणांना संपवून टाकू अशी प्रक्षोभक भाषा वापरली होती. या वक्तव्याचे पडसाद तर विधानसभेत उमटले. सत्ताधारी आमदारांनी प्रक्षोभक वक्तव्ये करणाऱ्यांवर टीका केली. तसेच ही वक्तव्ये करणाऱ्यांमागे कोणाचा हात आहे याचा तपास करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. आमदार राम कदम यांनी तर प्रक्षोभक विधानांमागे आमदार रोहित पवार असल्याचा संशय व्यक्त करून तपासाची मागणी केली आहे.

https://www.youtube.com/watch?v=KoIvFFNh4tI

कोण आहेत रोहित पवार ? का आले आहेत अडचणीत ?

रोहित पवार शरद पवारांचे लाडके नातू आहेत.
रोहित पवार कर्जत - जामखेडचे आमदार आहेत.
अजित पवारांशी रोहित यांचा उभा दावा आहे.
रोहित पवार ट्रोल आर्मी पाळतात असा आक्षेप.
रोहित यांच्या ट्रोल गॅंगचा सदस्य योगेश सावंत अटकेत.
ब्राह्मण संपवण्याचा विखार रोहित यांच्या समर्थकांकडून - भाजपा
योगेश सावंत ला सोडवण्यासाठी रोहित प्रयत्नशील - भाजपा
रोहितकडून मराठ्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र - राम कदम

रोहित पवारांची ट्रोल आर्मी आहे तरी कशी ?

योगेश सावंत -

शरद पवार समर्थक म्हणून वावर
शरद पवार विरोधकांचा समाज माध्यमात छळ करण्याची जबाबदारी
स्वतःच्या अकाऊंटवरून शरद पवार विरोधकांची बदनामी करतो.
शरद पवार विरोधकांना धमकावणे, बदनामी करणे, हीन शेरेबाजी करण्यात अग्रेसर
सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांच्यासोबत हिणकस योगेश सावंतचा वावर
बनावट फेसबुक प्रोफाइल चालवण्यात पटाईत

मोहसीन शेख - २


शरद पवार समर्थक म्हणून वावर
शरद पवार समर्थक बनून महिलांबाबत विकृत शेरेबाजी
विकृत शेरेबाजी करूनही मोहसिनचा जयंत पाटील यांच्याकडून सन्मान
विकृत मोहसीनकडून पुणेकर पत्रकाराच्या पत्नीचा छळ
पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्थानकात मोहसिनवर गुन्हा
मोहसीन शेख, महादेव बालगुडे आणि सचिन बाळासाहेब कुंभार आरोपी
महिलेची बदनामी करणाऱ्या मोहसिनवर भा.दं.वि. ५००, ५०७, तसेच आयटी कायच्याच्या कलम ६७ अनुसार गुन्हा
महिलेची बदनामी करणाऱ्या मोहसिनचा सुप्रिया सुळेंच्यासोबत वावर

महादेव विकास बालगुडे - ३


शरद पवार समर्थक म्हणून वावर
मूळचा बारामतीच्या म्हसोबा नगरचा रहिवासी
पेशाने एमआयडीसीतला कामगार,
बेरोजगार झाल्यावर कागल इथे दुग्धविकास प्रकल्प काढण्यात अपयशी
व्यावसायिक अपयशानंतर फसवणुकीच्या धंद्यात सक्रिय
बनावट नावाने फेसबुक प्रोफाइल चालवण्यात पटाईत
देव गायकवाड अशा टोपण नावाने वावर
फडणवीसांच्या ओएसडी महिलेच्या नावे बनवले बनावट फेसबुक अकाउंट
ओएसडी महिलेच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट वापरून फसवणुकीचा प्रयत्न
मुख्यमंत्र्यांकडून मदत मिळवून देण्याच्या बदल्यात पैसे उकळण्यात सक्रिय
मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात दाखल गुन्ह्याच्या आधारे अटक
महिलेचा छळ केल्याचाही महादेव बालगुडेवर गुन्हा


सम्बन्धित सामग्री