Friday, July 05, 2024 03:06:01 AM

महाराष्ट्राच्या राजकारणातली धाकली पाती

महाराष्ट्राच्या राजकारणातली धाकली पाती

मुंबई, २४ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापू लागले आहे. यानिमित्ताने शब्दबाण सुरू आहेत आणि राजकीय स्पर्धा तीव्र होत आहे. राजकारणासाठी घराघरात संघर्ष उभा राहिलेला आपण अनेकदा पाहिलाय. यंदाच्या निवडणुकीत हा संघर्ष महाराष्ट्र नव्याने अनुभवू शकतो कारण, पवारांच्या घरातच यंदा संघर्ष उभा ठाकला आहे. या स्थितीत आणखी एक चर्चा आहे ती, महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकीय घराण्यांमधील राजकीय वारसदारांची. आत्ताच्या या विशेष भागात चर्चा या मुद्द्याबाबत….

युगेंद्र पवार यांना राशपमध्ये मोठी जबाबदारी ?

अजित पवारांनी घेतलेला निर्णय हा पवार कुटुंबाला पटलेला नसल्याचं सांगण्यात येत आहे. चारच दिवसापूर्वी अजित पवारांनी जाहीर सभेत सांगितले होते की माझं कुटुंब सोडून इतर कुणीही माझ्या कुटुंबातील माझा प्रचार करणार नाही. त्यानंतर काही दिवसांतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांनी बारामतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार शहर कार्यालयाला भेट दिली. शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी शहर कार्यालयाला उपस्थित राहण्याचे आवाहन युगेंद्र पवार यांनी केलं . एकंदरीत आता युगेंद्र पवार हे शरद पवार गटात सामील होत असल्याने अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जातोय.

कोण आहेत युगेंद्र पवार? (Who is Yugendra Pawar ?)

अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे युगेंद्र पवार चिरंजीव

युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचे खजिनदार

शरयु ग्रुपच्या माध्यमातून युगेंद्र पवार व्यवसायामध्ये सक्रिय

शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती,इंदापूर आणि फलटण तालुक्यात अनेक सामाजिक कामे केली

वनीकरण, ओढा खोलीकरण, विहीर बांधून देणं यामुळं अनेक शेतकऱ्यांशी जोडले गेले

फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखाना युगेंद्र पवार पाहतात

बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत युगेंद्र पवार

जय अजित पवार काय करत आहे ?

पवार कुटुंबातला आणखी चेहरा निवडणुकीच्या रिंगणात आलाय, जय अजित पवार. महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय निवडणुकीच्या राजकारणाचे प्रशिक्षण घेतोय. बारामतीतील कसबा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाला भेट दिली.. यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.. त्यांच्या हस्ते सोशल मीडिया सेलच्या निवडीचे नियुक्त पत्र जय पवार यांच्या हस्ते देण्यात आले.. यावेळी जय पवार यांनी आलेल्या कार्यकर्त्यांना पक्ष संघटना आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात संवाद साधत कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.

आमदार रोहित पवार

पवारांच्या घरात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचा राजकीय वारस म्हणून पाहिलं जातेय ते आमदार रोहित राजेंद्र पवार यांना. गेल्या अर्थात 2019च्या निवडणुकीत पवार कुटुंबियांतून रोहित पवार विधानसभेची निवडणूक लढले. पवारांच्या तिसऱ्या पिढीतून रोहित पवार हे सर्वप्रथम राज्याच्या राजकारणात उतरले.. रोहित हे राजेंद्र पवारांचे पुत्र. शरद पवारांचे भाऊ आप्पासाहेब आणि त्यांचे चिरंजीव राजेंद्र यांचा मुलगा रोहित. राजेंद्र पवार यांनी कृषी व्यवसायात लक्ष दिले. पुढे त्यांची धुरा रोहित पवार यांनी सांभाळली. रोहित जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सक्रीय राजकारणात आले. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन अर्थात इस्मा या संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहतायत. तसेच, बारामती ऍग्रो लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारीही आहेत. ग्रामीण राजकारणाचा पाया जिल्हा परिषद असतो. जिल्हा परिषदेत काम केल्यामुळे रोहित पवार राजकारणात चर्चेत आले आहे. सध्या आमदार झाल्यानंतर थेट अजित पवारांना आव्हान दिल्यामुळे रोहित जास्त चर्चेत आलेले आहेत.

कोण आहे रोहित पवार ?

शरद पवार यांचे नातू

राजेंद्र पवार यांचा मुलगा

पवार कुटुंबातील राजकारणातील चौथी पिढी

जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकारणाची सुरुवात

भाजपातून आमदारकीसाठी प्रयत्न

कर्जत-जामखेड मतदार संघातून २०१९च्या विधानसभा निवडणुकीत विजयी

पवारांचा राजकीय वारस म्हणून ओळख बनवण्याचा प्रयत्न

बारामती ऍग्रोचा आर्थिक व्याप वाढवण्यात यशस्वी

राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवारांसोबत एकनिष्ठ

सुप्रिया गटाचे राज्यात नेतृत्व करण्याची इच्छा

रोहित पवारांसाठी जमेची बाजू

थेट शरद पवार यांचे नातेवाईक

पवार कुटुंबाचा राजकिय वारसा

यशस्वी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ता

उद्योगाला उभारी देत रोजगार निर्मिती

पवार घराण्यातील राजकारणातली चौथी पिढी

ग्रामीण ते शहरी राजकारणाचा अनुभव

रोहित पवार भाजपात जाणार होते

भाजपात जाणार होते रोहित पवार
रोहित पवारांनी भाजपात जाण्यासाठी तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती.
मनासारखा मतदारसंघ आणि आमदारकीचा रोहित यांचा हट्ट होता.
पवार कुटुंबात राहून हट्ट पूर्ण होत नसल्याने रोहित भाजपात जायला निघाले होते.
मात्र, कर्जत जामखेड मतदारसंघात यांची सोया लावत समजूत काढली गेली.

पार्थ पवारांचे राजकारण

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन मुलं…पार्थ अजित पवार आणि जय अजित पवार….गेल्या लोकसभा निवडणूकांमध्ये अजित पवार यांचा मोठा मुलगा पार्थ याने राजकारणात पाऊल ठेवले…गेल्या लोकसभेत मावळ या मतदारसंघातून पार्थ याने निवडणूक लढवली…पण, पार्थचा पराभव झाला. हा पराभव पवार कुटुंबासाठी मोठा धक्का होता…

पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरुन २०१९ मध्ये पवार कुटुंबातला संघर्ष चव्हाट्यावर आला…पाहुयात त्यावेळेस नक्की काय घडले..

लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

त्यात पार्थ पवार यांचं नाव नव्हतं

त्यामुळे पुन्हा कौटुंबिक वादाच्या चर्चा सुरू झाल्या

शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली

पण ऐनवेळी शरद पवारांनी या निवडणुकीतून माघार घेतली.

एकाच कुटुंबातील कितीजण निवडणूक लढणार असं सांगत शरद पवारांनी माघार घेतली

नव्या पिढीला संधी देणार असेही शरद पवार म्हणाले

शरद पवार यांनी पार्थ पवारांमुळे निवडणूकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला अशी चर्चा

रोहीत पवार यांनी शरद पवार यांनी निर्णयाचा पुर्नविचार करावा अशी फेसबुक पोस्ट लिहिली.

त्यानंतर पार्थ पवार यांना मावळमधून उमेदवारी जाहीर झाली.

निवडणुकीत पार्थचा पराभव झाला.

निवडणुकीत पराभूत झालेले पवार कुटुंबातले ते पहिले सदस्य ठरले.

सुशांत सिंह आणि पार्थ पवार

पार्थ पवार यांनी सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची केलेली मागणी आणि राम मंदीराच्या भूमिपूजनावरून हा ऐतिहासिक क्षण म्हणतं 'जय श्रीराम'चा दिलेला नारा या दोन्ही गोष्टी शरद पवार यांच्या मतापासून भिन्न…या दोन्ही प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पार्थ पवार यांच्या भूमिका परस्पर विरुद्ध होत्या. पार्थ पवार राजकारणात येण्याआधीपासून शरद पवारांनी त्यांचं उघडपणे कौतुक केलेलं कधीही दिसलं नाही. याउलट पार्थ यांच्या राजकारणातल्या प्रवेशाच्या आधीपासून शरद पवारांनी कायम तटस्थ भूमिका घेतलेली दिसली. पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत. आम्ही त्यांच्या मता कवडीचीही किंमत देत नाही," शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत केलेलं हे वक्तव्य. या वक्तव्यामुळे पवार घराण्यातले मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले होते. पवार घराण्यातल्या वादावर पुन्हा चर्चा होऊ लागली होती…

रेवती सुळे राजकारणात ?

शरद पवार यांच्यानंतर पवार कुटुंबातून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. सुप्रिया सुळे थोड्या उशिरा राजकारणात उतरल्या. परंतु, त्यांच्या राजकारणातील प्रवेशाने कुटुंबात कोणतेही मतभेद झाले नाहीत, अस पवार कुटुंबीय सांगतात…..शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असे जाहिर केल्यावर मोठा वाद झाला…त्यानंतर सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादीची कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले…आणि हे घडल्यानंतर काही दिवसातच राष्ट्रवादीत फूट पडली…

आता वडीलांची धुरा सुप्रिया सुळे सांभाळत आहेत…सुप्रिया यांना दोन मुले…रेवती आणि विजय….

आता सुप्रिया सुळे यांची राजकीय धुरा सांभाळण्यासाठी सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे तयार होत आहे….

शरद पवारांची लाडकी नात

सुप्रिया आणि सदानंद सुळे यांची लेक

लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून पदवी पूर्ण

सध्या राजकीय प्रशिक्षण सुरू

कृषी आणि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण सुरू

महाराष्ट्राच्या राजकारणातील इतर धाकली पाती

महाराष्ट्राच्या राजकारण्यांचा जर विचार केला तर नव्या आणि तरुण पिढीमध्ये सर्वात लोकप्रिय आणि सिनिअर आहे आदित्य ठाकरे…
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू…माजी मुख्यमंत्री आणि शिउबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा…आणि ठाकरे कुटुंबियांची राजकारणातली नवी पिढी….तरुण पिढी….

पाहुयात आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भातला अधिक तपशील

जन्म १३ जून, १९९० मुंबई

मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमधून आपले शिक्षण पूर्ण

मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिकत असताना बीए इतिहास पदवी मिळविली

के सी लॉ कॉलेज मधून मास्टर डिग्री घेऊन एलएलबी पदवी मिळविली

२०१० मध्ये युवा सेनेचे अध्यक्ष म्हणून नियुक्त

२०१८ मध्ये शिवसेना पक्षाचे नेते म्हणून नियुक्त

ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांनी मुंबईच्या वरळी मतदारसंघातून विधानसभा लढवली

२०२० मध्ये मुंबई उपनगरी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त

निवडणूक लढविणारे आणि जिंकणारे ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य

३० डिसेंबर २०१९ रोजी कॅबिनेट मंत्री म्हणून नियुक्ती

आदित्य यांना असलेली संधी

राजकारणात टिकून राहिल्यास भविष्य आहे
मुंबई महानग पालिका राखण्याची जबाबदारी
युवासेना बांधणीतून युवा कार्यकर्त्याची फळी सोबत
आमदारकी टिकल्यास आणि सत्ता आल्यास पुन्हा मंत्रीपद
राजकीय टीका करताना सांभाळून बोलल्यास भवितव्य उज्ज्वल


सम्बन्धित सामग्री