Saturday, July 06, 2024 11:14:13 PM

मराठा आंदोलनात फूट ?

मराठा आंदोलनात फूट

जालना, २३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात फूट पडल्याची चर्चा आहे. आंदोलक मनोज जरांगे आणि त्यांचे सहकारी अजय बारस्कर महाराज यांच्यात मतभेद सुरू झाले आहेत. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातून एकमताने काही तरतुदी करून घेतल्या आहेत. या तरतुदी झाल्या असताना आंदोलनाचे तुणतुणे कशासाठी, असा प्रश्न बारस्कर महाराज यांनी उपस्थित केला आहे, तर शनिवारपासून राज्यभर रास्ता रोको करा असे मनोज जरांगेंनी मराठ्यांना सांगितले आहे.

याआधी 'मनोज जरांगे हा नाटकी माणूस आहे… त्याला कायद्याचे ज्ञान नाही… फक्त स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात कसे ठेवता येईल याचा विचार करणे जमते… जरांगेंने काही गुप्त बैठका घेतल्या… त्याने सहकारी आंदोलकांना विश्वासात घेण्याऐवजी आंदोलनाच्या मदतीने फक्त स्वतःला मोठे करण्याचा प्रयत्न चालवला आहे… कोणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर जरांगे ऐकून घेत नाही… पण शिवाजी महाराजांच्या पुतळाच्या जवळ आडवे पडून राहतो… लोळतो… महिलांना, मंत्र्यांना, सरकारी अधिकाऱ्यांना शिव्या देतो… मंत्र्यांचा, नेत्यांचा जाहीर अपमान करतो, एकेरीत बोलतो… असे अजय बारस्कर महाराज म्हणाले.

मराठा आंदोलनाशी संबंधित दोन प्रमुख व्यक्ती एकमेकांवर आरोप करू लागले आहेत. आंदोलनाच्या मुद्यावर या दोघांनी एकमेकांच्या विरोधात बोलायला सुरुवात केली आहे. यामुळे मराठा आंदोलन फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.


सम्बन्धित सामग्री