Saturday, July 06, 2024 10:59:36 PM

मराठा आरक्षणासाठी मंगळवारी विशेष अधिवेशन

मराठा आरक्षणासाठी मंगळवारी विशेष अधिवेशन

मुंबई, १९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंगळवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनाची सुरुवात राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने होईल. यानंतर कामकाज सुरू होईल.

शिंदे सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी मुंबईत मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात शुक्रे अहवाल, मराठ्यांना द्यायच्या आरक्षणातील तरतुदी या मुद्यांवर सविस्तर चर्चा होईल. सगेसोयरे यांनाही आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे करत आहेत. पण सगेसोयरेच्या मुद्यावर अनेक आक्षेप आले आहेत. यामुळे विशेष अधिवेशनात सगेसोयरे यांना आरक्षण देण्याबाबतचा निर्णय होणार नाही. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत त्यांना ओबीसी अंतर्गत कुणबी म्हणून आरक्षण देण्याची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी आढळलेल्या नाहीत अथवा ज्या मराठ्यांना नोंदी आढळूनही कुणबी होण्याची इच्छा नाही त्यांना मराठा म्हणून आरक्षण देण्याच्या मुद्यावरही विशेष अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे.

अधिवेशनात 'या' मुद्यांवर चर्चेची शक्यता

उच्चवर्णीय मराठे शुक्रे अहवालात मराठे मागास होणार ?
मराठ्यांना आरक्षण कसे मिळणार ?
मराठ्यांना जात बदलता येईल का ?
मराठ्यांना कुणबीतून आरक्षण मिळेल का ?
मराठ्यांना आरक्षण मराठा म्हणून मिळेल का ?

जरांगेंचे समाधान होणार का ?

मराठ्यांना आरक्षण देताना सगेसोयरेंनाही आरक्षणाचा लाभ देण्याची मागणी जरांगे करत आहेत. पण या मागणीबाबत आलेल्या अनेक आक्षेपांमुळे हा मुद्दाच चर्चेतून वगळला जाण्याची शक्यता आहे. यामुळे विशेष अधिवेशनानंतर तरी जरांगे यांचे समाधान होणार का हा प्रश्न कायम आहे.


सम्बन्धित सामग्री