Monday, July 01, 2024 02:42:34 AM

सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवणार ?

सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवणार

बारामती, १६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार उभ्या राहण्याच्या तयारीत आहेत.

सुनेत्रा पवार यांच्या विविध विकास कामांचा आढावा घेणारा चित्ररथ शुक्रवार सकाळपासून बारामती शहरात फिरू लागला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे विविध मेळाव्यांच्या निमित्ताने बारामतीत असून खासदार सुप्रिया सुळे यादेखील दिवसभर बारामतीमध्ये आहेत. यामुळे बारामतीच्या निवडणूक रिंगणात नणंद आणि भावजय यांच्यातील राजकीय संघर्ष दिसणार असल्याची चर्चा आहे. अधिकृत घोषणा झाली नसली तरी ताज्या घडामोडींमुळे चर्चेला उधाण आले आहे.


सम्बन्धित सामग्री