Saturday, September 28, 2024 07:47:26 PM

'उद्धव यांच्या डोक्यावर परिणाम झालाय'

उद्धव यांच्या डोक्यावर परिणाम झालाय

मुंबई, १० फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राज्यात मागील काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिउबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषद घेत या मुद्द्यावर राज्य सरकारवर कडाडून टीका केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान या टीकेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
राज्यात ज्या घटना घडल्या त्या व्यक्तीगत वैमनस्यातून घडल्या आहेत. त्या घटना गंभीर आहेत, त्यांचं गांभीरता मी नाकारत नाही. पण व्यक्तीगत वैमनस्यातून या घटना घडल्याने याचा थेट कायदा आणि सुव्यवस्था आणि राज्याची परिस्थिती याच्याशी संबंध जोडणे अयोग्य आहे. ज्या दोन तीन घटना आहेत त्यापाठीमागे वयक्तीक कारणे हेवेदावे आहेत. त्यांची भांडणे, व्यवहार आहेत. त्याबाबत आम्ही कडक कारवाई करत आहोत असे फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

घोसाळकर यांच्या हत्या प्रकरणात एका पक्षाच्या महिला किंवा पुरुष प्रवक्त्याचा हात असून याची निष्पक्ष चौकशी केली जावी अशी मागणी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, विजय वडेट्टीवारांना फार काही माहिती नसतं, ते अशा सनसनाटी गोष्टी बोलत असतता. कुठल्याही गोष्टीची योग्य प्रकारे होईलच. पण अलिकडच्या काळात गोपीचंद जासूस, जग्गा जासूस तयार झालेत त्यांनी विचारपूर्वक बोललं पाहिजे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


सम्बन्धित सामग्री