Sunday, June 30, 2024 10:01:01 AM

पुण्यात मोदीविरोधी कार्यक्रमाला भाजपचा विरोध

पुण्यात मोदीविरोधी कार्यक्रमाला भाजपचा विरोध

पुणे, ०९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : "जय श्रीराम", अशी जोरदार घोषणाबाजी करत भाजपने शनिवारी मोदी विरोधकांचा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न केला, मात्र मविआने, समविचारी पक्ष व संघटनानी एकत्र येत हाणून पाडला. दरम्यान, भाजपा आणि माविआ आमनेसामने आल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण तयार झाले होते, मात्र पोलिसांनी आंदोलकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर चित्र काही प्रमाणात बदलले.

दांडेकर पुलाजवळील राष्ट्र सेवा दल येथे विविध संघटनांमार्फत "लढा लोकशाहीचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा" या विषयावर शनिवारी सायंकाळी कार्यक्रम घेण्यात आला होता. दरम्यान, मोदी विरोधकांनी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर आडवाणी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह विधान केले होते. या पार्श्भूमीवर, शनिवारी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तसेच त्यांनी हा कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न केला.

यावेळी मविआने, समविचारी पक्ष व संघटनानी एकत्र येत घोषणा देत भाजपला विरोध केला. त्यामुळे काही प्रमाणात वातावरण तणावपूर्ण झाले. दरम्यान, वरिष्ठ पोलीस अधिकारी व उपस्थित पोलिसांनी भाजपच्या आंदोलन करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर वातावरण काही प्रमाणात वातावरण निवळले. त्यानंतर कार्यक्रमासाठी सर्वसामान्य नागरिकांना सोडण्यात आले.

                 

सम्बन्धित सामग्री