Thursday, September 19, 2024 05:34:52 AM

लोकसभेत मोदी सरकारकडून श्वेतपत्रिका सादर

लोकसभेत मोदी सरकारकडून श्वेतपत्रिका सादर

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी गुरुवारी लोकसभेत श्वेतपत्रिका सादर केली. युपीए सरकारच्या कारभारावरील श्वेतपत्रिका आणली आहे. यूपीए सरकारच्या १० वर्षाच्या आर्थिक कामगिरीवर श्वेतपत्रिका आणण्यात आली आहे. मोदी सरकार या श्वेतपत्रिकेत २०१४च्या आधीचे आणि २०१४ नंतर भारत आणि भारताची अर्थव्यवस्थेत झालेला फरक दाखवणार आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृह राज्यसभेत श्वेतपत्रिकेवर शनिवारी चर्चा होणार आहे.

युपीएने १० वर्षात इकोनॉमीला नॉन-परफॉर्मिग बनवलं असल्याचं मोदी सरकार आपल्या श्वेतपत्रिकेत म्हटलंय. लोकसभेत या श्वेतपत्रिकेवर चर्चा केली जाणार आहे, तर शनिवारी राज्यसभेत चर्चा होईल. श्वेतपत्रिकेद्वारे मोदी सरकारने २०२४ सालापूर्वी देशासमोर कोणती आर्थिक आणि वित्तीय आव्हाने होती. २०१४ नंतर मोदी सरकारने या आव्हानांना कसे तोंड दिले आणि त्यावर मात कशी केली? हे सांगितलंय.


सम्बन्धित सामग्री