Thursday, September 19, 2024 07:00:02 AM

राज्यसभेवर तावडे की राणे ?

राज्यसभेवर तावडे की राणे

मुंबई, ०८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : येत्या २७ फेब्रुवारीला राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्यानिमित्ताने महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळालीत घडामोडींना पुन्हा एकदा वेग येताना दिसत आहे. सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार राज्यसभेच्या एकूण सहा जागांपैकी तीन जागा भाजप,शिवसेना शिंदे गटाला एक आणि राष्ट्रवादी दादा गटाच्या वाट्याला एक जागा येण्याची शक्यता आहे. भाजपच्या वाट्याला सर्वाधिक तीन जागा येत असल्याने पक्षाकडून कोणत्या नेत्यांना उमेदवारी दिली जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

राज्यसभेवर वर्णी लावण्यासाठी भाजपमध्ये प्रचंड चुरस असून पक्षाचे अनेक प्रमुख नेते या शर्यतीमध्ये असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र भाजपकडून नऊ नेत्यांची यादी दिल्लीत पाठवण्यात आल्याची चर्चा आहे. यापैकी आता कोणत्या तीन नेत्यांना भाजपचे केंद्रीय नेतृत्त्व संधी देणार, हे पाहावे लागेल. दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये नऊ जणांची नावे निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांची नावे निश्चित असल्याचे सुत्रांनी सांगितले.

याशिवाय, भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळू शकणाऱ्या नेत्यांमध्ये नारायण राणे किंवा विनोद तावडे यांचा समावेश आहे.


सम्बन्धित सामग्री