Tuesday, July 02, 2024 08:45:52 AM

मराठ्यांनी खांद्यावर घेतलं, चिवटेंना अश्रू अनावर

मराठ्यांनी खांद्यावर घेतलं चिवटेंना अश्रू अनावर

नवी मुंबई, २८ जानेवारी २०२३, प्रतिनिधी : अखेर सरकारने जरांगेच्या मागण्या मान्य करून पहाटे जीआर काढला आहे. मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला आहे. मनोज जरांगे पाटील यांचा संघर्ष, जिद्द, मराठ्यांचा संयम, बलिदान आणि त्याग याच्या बळावर मराठ्यांना विजयी सभा करता आली. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत विजयी सभा पार पडली. यावेळी सरकारचे संवाददूत मंगेश चिवटेंना खांद्यावर घेतलं. मराठ्यांचं प्रेम पाहून चिवटेंना अश्रू अनावर झाले.

पहाटेपर्यंत चर्चा
काल रात्री पुन्हा एकदा सरकारचं शिष्टमंडळ जीआर घेऊन मनोज जरांगे यांच्याकडे नवी मुंबईत गेले. या शिष्टमंडळात मंगेश चिवटेही होते. रात्री अडीच वाजेपर्यंत चर्चा झाली. जरांगे यांना अध्यादेश वाचून दाखवण्यात आला. त्यानंतर समाधान झाल्यावर मध्यरात्रीच 3 वाजता पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलं. सकाळी आंदोलन मागे घेणार असल्याचंही सांगितलं.

तिथेच खांद्यावर घेतले
मंगेश चिवटे यांनी सातत्याने मनोज जरांगे यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या प्रत्येक शंकानिरसन करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांची भूमिका सरकारपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचवण्याचं कामही केलं. कोणतीही प्रसिद्धी न घेता, कोणतेही मीडिया बाईट न करता त्यांनी आपली भूमिका पार पडली. जेव्हा सकाळी विजयाचा गुलाल उधळला गेला, तेव्हा मराठ्यांनी पहिला विजयाचा गुलाल मंगेश चिवटे यांच्या कपाळाला लावला. त्यानंतर चिवटे यांना खांद्यावर घेऊन ठेका धरला. अचानकपणे झालेल्या या आदरसत्काराने चिवटेही भारावून गेले. यावेळी त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले.

View this post on Instagram

A post shared by JaiMaharashtraLive (@jaimaharashtralive)


सम्बन्धित सामग्री