Saturday, October 05, 2024 03:19:31 PM

राष्ट्रवादी अपात्रता सुनावणी

राष्ट्रवादी अपात्रता सुनावणी

मुंबई, २३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी विधिमंडळात विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे मंगळवार २३ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी होईल. दुपारी बारा वाजता सुप्रिया गटाच्या आमदारांची उलट तपासणी सुरू होणार आहे.

मुंबईत २७ ते २९ जानेवारी या काळात अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद होणार आहे. या परिषदेला देशातील सर्व विधानसभा, विधानपरिषदेचे सभापती, उपसभापती, सचिव उपस्थित असतील. परिषदेच्या तयारीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी अकरा वाजता बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राज्य शासन आणि मुंबई महापालिकेचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी या बैठकीला उपस्थित असतील.

अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. या अतिरिक्त कालावधीचा विचार करून किमान दहा दिवसांची मुदतवाढ मागून घेतली जाण्याची शक्यता आहे.


सम्बन्धित सामग्री