Saturday, October 05, 2024 03:05:46 PM

'नार्वेकर, हिंमत असेल तर जनतेत या'

नार्वेकर हिंमत असेल तर जनतेत या

मुंबई, १६ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : उद्धव गटाने पत्रकार परिषद घेऊन शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर काही प्रश्न उपस्थित केले. तसेच हिंमत असेल तर जनतेत या, या शब्दात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाच जाहीर आव्हान दिले. घटनात्मक संस्था आणि घटनात्मक पद यांच्याविषयी एरवी नेते आदराने बोलतात. पण उद्धव गटाच्या पत्रकार परिषदेत घटनात्मक पदावरील व्यक्तीला आव्हान देण्याचा प्रकार घडला.

उद्धव गटाच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

'नार्वेकरांनी स्वतःला न्यायालयापेक्षा वरचढ दाखवले'
अनिल परब यांचा नार्वेकरांवर आरोप

'नार्वेकर, हिंमत असेल तर जनतेत या'
उद्धव यांचे नार्वेकरांना आव्हान

'शिंदेंची अध्यक्ष होण्याची लायकी नाही'
उद्धवनी काढली मुख्यमंत्र्यांची लायकी

शिवसेनेचा २०१८चा पक्षांतर्गत ठरावाचा व्हिडिओ
नेतेपदी शिंदेंची निवड, शिंदेंचा फोटो उद्धव गटाने दाखवला

जी घटनादुरुस्ती नार्वेकरांनी नाकारली
त्याच ठरावाला नार्वेकरांची हजेरी
उद्धव गटाने आणला जुना व्हिडिओ समोर

नार्वेकरांनी टराटरा फाडला परबांचा बुरखा

उद्धव गटाच्या पत्रकार परिषदेला उत्तर म्हणून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव समर्थक आमदार अनिल परब यांचा बुरखा टराटरा फाडला. शिवीगाळी व्यतिरिक्त उद्धव गटाच्या पत्रकार परिषदेत काहीही नाही… कोणत्याही संस्थेवर उद्धव यांचा अविश्वासच… उद्धव यांच्याकडून निवडणूक आयोगाचा अवमान… हे महत्त्वाचे मुद्दे मांडत नंतर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसारच निकाल दिल्याची माहिती नार्वेकर यांनी दिली.

नार्वेकरांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

'शिवीगाळी व्यतिरिक्त पत्रकार परिषदेत काहीही नाही'
उद्धव गटाच्या आरोपांवर नार्वेकरांनी सुनावले

'कोणत्याही संस्थेवर उद्धव यांचा अविश्वासच'
'उद्धव यांच्याकडून निवडणूक आयोगाचा अवमान'
विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचा हल्लाबोल

'झिरवाळांनी कार्यवाह अध्यक्ष म्हणून घेतलेल्या निर्णयांना आव्हान'
नार्वेकरांनी समोर आणली वस्तुस्थिती

'गोगावलेंची निवड न्यायालयाकडून अयोग्य ठरवलेली नाही'
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य

'मूळ राजकीय पक्ष मान्य घटनेनुसारच'
सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा, नार्वेकरांचं वक्तव्य


सम्बन्धित सामग्री