Sunday, June 30, 2024 09:39:29 AM

‘घोंचू मोदी’ शब्दावरून पेटले राजकारण

‘घोंचू मोदी’ शब्दावरून पेटले राजकारण

मुंबई, १५ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : लोकसभेची निवडणूक जवळ येऊ लागल्यापासून राजकीय विरोधकांवर चिखलफेक करण्याचा प्रकार वाढला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मोदी विरोधी गटाच्या नेत्यांना एक संदेश ट्वीट केला आहे. या संदेशात त्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोंचू हा शब्द वापरला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या ट्वीटला सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटचे भाजपाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी ट्विटरवर उत्तर दिले आहे.

'मोदी आणि त्यांच्या पक्षाने वेळोवेळी काही विरोधी नेत्यांची अपमानास्पद नावे घेऊन त्यांची खिल्ली उडवली आहे. काल मी मोदींना घोंचू म्हटले. आमचा प्रस्ताव आहे की तुम्ही हा शब्द घ्या आणि त्याला एकत्रितपणे घोंचू म्हणा' असा संदेश प्रकाश आंबेडकर यांनी मोदी विरोधी आघाडीला उद्देशून ट्वीट केला आहे. या ट्वीटला आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी उत्तर दिले आहे.

'प्रकाश जी,
तुम्ही तुमचे आडनाव या राष्ट्राने निर्माण केलेल्या महान विचारवंतांपैकी एक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून घेतले आहे! निदान त्या आडनावासाठी तरी अशी भाषा वापरणे सोडून द्या! खरंच, तुम्ही MVA आणि INDI अलायन्सला त्यांच्या गोटात तुमच्या प्रवेशासाठी भीक मागत आहात हे पाहून वाईट वाटते, तरीही भाजपला त्याचा काहीही फरक पडणार नाही…! या महान देशाच्या लाखो लोकांनी आधीच पंतप्रधान म्हणून मोदीजींना तिसर्‍यांदा विजय मिळवून देण्याचा निर्धार केला आहे!' या शब्दात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी प्रकाश आंबेडकर यांना उत्तर दिले आहे.

https://twitter.com/Kalyanshetti_S/status/1746750253288816666


सम्बन्धित सामग्री