Saturday, October 05, 2024 06:48:27 PM

उद्धव गटाला धक्का

उद्धव गटाला धक्का

मुंबई, १० जानेवारी २०२४, प्रतिनिधी : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी संध्याकाळी निकाल जाहीर केला. या निकालामुळे उद्धव गटाला धक्का बसला. भारत निवडणूक आयोगापाठोपाठ विधानसभाध्यक्षांनीही शिवसेनेची १९९९ ची घटना ग्राह्य धरून निकाल दिला. उद्धव गटाने २०१८ ची घटना ग्राह्य धरण्याची विनंती केली होती. पण ही विनंती फेटाळण्यात आली. निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असलेला पक्ष भारतात ग्राह्य धरला जातो. आयोगाकडे शिवसेनेची १९९९ ची घटना आहे. यामुळे हीच घटना ग्राह्य धरून शिवसेना या पक्षाबाबतचा निर्णय विधानसभाध्यक्षांनी दिला.

महत्त्वाचे मुद्दे

आमदार अपात्रता निकालाचे वाचन सुरू
'भारत निवडणूक आयोगानुसार शिवसेनेची १९९९ची घटना ग्राह्य'
'ग्राह्य धरलेल्या घटनेनुसार शिवसेनेत राष्ट्रीय कार्यकारिणी सर्वोच्च'
'शिवसेनेत १९९९च्या घटनेनुसार पक्षप्रमुख नामधारी'
'शिवसेनेत १९९९च्या घटनेनुसार खरी ताकद राष्ट्रीय कार्यकारिणीकडे'
'एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी अयोग्य'
शिंदेंच्या हकालपट्टीचा निर्णय राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतलेला नाही
उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर सवाल
शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षप्रमुख मनमानी करू शकत नाहीत
शिंदे गट हीच खरी शिवसेना
शिंदेंकडे पक्षांतर्गत बहुमत - नार्वेकर
गोगवलेंना प्रतोद म्हणून मान्यता - नार्वेकर
शिंदे समर्थक आमदार पात्र

'सुनील प्रभूंना पक्षादेश काढण्याचा अधिकारच नाही'

'नारदमुनीमुळे हे दिवस आले', भुसे यांची संजय राऊतांवर टीका

सेना भवनाबाहेर उद्धव गट आक्रमक, राहुल नार्वेकरांच्या विरोधात घोषणाबाजी

सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार - आदित्य

उद्धव गटाचे सर्व आमदार पात्र


सम्बन्धित सामग्री