Wednesday, October 02, 2024 10:41:26 AM

'नार्वेकर अचानक आजारी पडले, अचानक बरे झाले'

नार्वेकर अचानक आजारी पडले अचानक बरे झाले

मुंबई, ०८ जानेवारी २०२३, प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल तयार झाल्याची सध्या चर्चा आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकालपत्राचा मसुदा पाठवला असून १० जानेवारीपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागणार असल्याचं सध्या बोललं जात आहे आणि यावर उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी सनसनाटी उत्तर देत शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. न्याय देणार न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन बंददाराआड भेटत असेल तर न्याय मिळणार कसा? असं म्हणत नार्वेकर-मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर राऊतांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

'देशाची न्यायव्यवस्था गंभीर स्वरुपाला पोहोचली'

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीवरुन राऊतांनी ताशेरे ओढले आहेत. न्याय देणार न्यायमूर्तीच आरोपीला जाऊन बंददाराआड भेटत असेल तर न्याय मिळणार कसा? असा सवाल उपस्थित करत, या देशाची न्यायव्यवस्था अत्यंत गंभीर स्वरुपाला जाऊन पोहोचली असल्याचं संजय राऊत म्हणाले.

'नार्वेकर अचानक आजारी पडले, अचानक बरे झाले'

"नार्वेकर अचानक आजारी पडले, आता ते अचानक बरे झाले. बरे झाल्यावर ते ताबडतोब जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले. म्हणजे न्यायालयाचा जो न्यायमूर्ती आहे, जो न्याय देणार आहे, तोच आरोपीला जाऊन बंद दाराआड भेटतो आणि चर्चा करतो, ही आपली न्यायव्यवस्था आहे आणि म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान धोक्यात आहे," असं संजय राऊतांनी म्हटलं.


सम्बन्धित सामग्री