डोंबिवली, २६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : अयोध्येत राम मंदिर व्हावं, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे देखील स्वप्न होतं अयोध्येत राम मंदिर व्हावं आणि ते मोदी साहेबांनी स्वप्न पूर्ण केलं, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी डोंबिवलीत आयोजित डोंबिवली जिमखाना उत्सवाला भेट दिली त्यावेळी शिंदेनी वक्तव्य केले होते.
डोंबिवली उत्सवात साकारलेल्या राम मंदिराला मुख्यमंत्री यांनी भेट दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते. मंत्री रविंद्र चव्हाण यांनी राम मंदिरात दर्शन घ्यायला लावल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दरम्यान अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक ("प्राण प्रतिष्ठा") समारंभ येत्या वर्षात २२ जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमाला १५००-१६०० "प्रतिष्ठित" पाहुण्यांसह सुमारे ८००० जण उपस्थित असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत मंदिराच्या उद्धघाटनाच्या कार्यक्रमावेळी भाविकांना संबोधित करतील.