Wednesday, April 23, 2025 09:28:13 PM

'कोल्हेंना लोकसभा निवडणुकीत हरवणार'

कोल्हेंना लोकसभा निवडणुकीत हरवणार

पुणे, २५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : लोकसभेसाठी २०२४ मध्ये होणार असलेल्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांचा पराभव करणार, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनी केली. अमोल कोल्हे खासदार झाल्यानंतर बराच काळ त्यांच्या मतदारसंघात फिरत नव्हते. काही काळानंतर ते राजीनामा देऊन पवारांची साथ सोडण्याचा विचार करत होते. पण अचानक कोल्हेंनी विचार बदलला. निवडणूक जवळ येताच यांना पदयात्रा सुचली. एरवी यांचा विशेष जनसंपर्क दिसत नाही. आता कोल्हेंविरोधात प्रबळ उमेदवार देणार, लोकसभा निवडणुकीत कोल्हेंचा पराभव करणार, असे अजित पवार म्हणाले. यावर उत्तर देताना पुन्हा उमेदवारी मिळाली तर निवडणूक लढवणार असे शिरुरचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले.


सम्बन्धित सामग्री