Wednesday, April 23, 2025 03:21:29 PM

उद्धव गटाचे दाऊद कनेक्शन

उद्धव गटाचे दाऊद कनेक्शन

नागपूर, १५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भाजपा आमदार नितेश राणे यांनी नागपूर अधिवेशनात गंभीर आरोप केले. मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट कटात हात असल्याचा आरोप दाऊद इब्राहीवर आहे. दाऊदचा जवळचा सहकारी सलीम कुत्ता याने पॅरोलवर असताना नाशिकमध्ये पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत उद्धव गटाचे नाशिकचे प्रमुख सुधाकर बडगुजर सहभागी झाले होते. सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर पार्टीत एकत्र नाचत असतानाचे फोटो आणि व्हिडीओ नितेश राणे यांनी विधानसभेच्या पटलावर ठेवले. या प्रकरणात चौकशी करावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली. राज्य शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथकाद्वारे चौकशी होईल, असे सांगितले.

https://twitter.com/NiteshNRane/status/1735589065830072369


सम्बन्धित सामग्री