शेलार यांचे मालवणीत गाऱ्हाणे

मुंबई, ४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोकण दौऱ्यावर येणारे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. त्यांच्या दौऱ्यावर होणारी टीका लक्षात घेऊन मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी खास मालवणी शैलीत ईडा पिडा टळो अशी देवाला प्रार्थना केली आहे. मालवणी शैलीतले गाऱ्हाणे हे बारा गावच्या, बारा वेशीच्या,बारा बावडीच्या,बारा नाक्याच्या,बारा गल्लीच्या,बारा शहरांच्या देवा ….होय म्हाराज्या..आई […]

शेलार यांचे मालवणीत गाऱ्हाणे

मुंबई, ४ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोकण दौऱ्यावर येणारे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. त्यांच्या दौऱ्यावर होणारी टीका लक्षात घेऊन मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी खास मालवणी शैलीत ईडा पिडा टळो अशी देवाला प्रार्थना केली आहे.

मालवणी शैलीतले गाऱ्हाणे

हे बारा गावच्या, बारा वेशीच्या,
बारा बावडीच्या,
बारा नाक्याच्या,
बारा गल्लीच्या,
बारा शहरांच्या देवा ….होय म्हाराज्या..
आई भराडी आणि रवळनाथा महाराज्या ..

उबाठा वडाची साल पिंपळाक लावतत… तोंडाक येता ता बोलत सुटले आसत, त्यांका वाईच अक्कल दी रे महाराज्या…
इंडिया आघाडी करून जनतेक लुटुचो डाव करतत त्यांका सगळ्यांचा तुझो हिसको दाखव रे महाराज्या…
जनसेवक पंतप्रधानांचो अपमान करतत.. त्यांचा काय ता बघून घे रे महाराज्या!
त्यांचीच “पनवती” त्यांच्याच घशात घाल.. रे महाराज्या..!

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number