Tuesday, July 02, 2024 08:55:35 AM

'लोकसभा निवडणूक लढवणार नाही'

लोकसभा निवडणूक लढवणार नाही

सिंधुदुर्ग, २९ नोव्हेंबर २०२३, प्रतिनिधी : गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते निलेश राणे चर्चेत आले आहेत. काही दिवसांपूर्वी निलेश राणे यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतल्याचं जाहीर केलं होतं. त्यांनी एक्सवर (ट्विटर) केलेली ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली होती. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांबरोबरच राजकीय वर्तुळातील अनेकांना धक्का बसला होता. मात्र, त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर त्यांनी आपला निर्णय बदलला. आता पुन्हा एकदा त्यांच्या लोकसभा उमेदवारीची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यासंदर्भात खुद्द निलेश राणे यांनीच खुलासा केला आहे. निलेश राणे यांनी ट्विट करून लोकसभा निवडणूकीसाठी इच्छुक नाही असं सांगितले असून कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात पक्षाचे काम करतोय आणि तिथेच काम करत राहणार असल्याचं ट्विट निलेश राणे यांनी केलंय.

निलेश राणेंचं ट्विट -

मी २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक नाही हे स्पष्ट करतो. या आधी अनेक वेळा स्पष्ट केलं आहे. आज परत करतो, कारण आज एका चॅनलवर ही बातमी मी बघितली. मी सध्या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात पक्षाचे काम करतोय आणि तिथेच करत राहणार.


सम्बन्धित सामग्री